डॉ. सचिन लांडगे - लेख सूची

रामदेवबाबा आणि समाजातल्या इतरही काही घटकांकडून ॲलोपॅथीला आरोपीच्या पिंजऱ्यात का उभे केले जाते?

नुकताच १ जुलैला डॉक्टर्स डे होऊन गेला. महिन्याभरापूर्वी रामदेवबाबाने ॲलोपॅथी आणि डॉक्टर या दोहोंबद्दलही अनुद्गार काढून आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उडवून दिला होता. नंतर जूनच्या मध्यावधीत “डॉक्टर तो भगवान के रूप होते हैं” असे म्हणत सारवासारव केली आणि आपणही लस घेणार असल्याचे सूतोवाच केले. असो. मुद्दा तो नाही. या चर्चांतून काही प्रश्न उपस्थित झाले. पहिला म्हणजे, पॅथी-पॅथींमधली (उपचारपद्धतींमधली) भांडणे ही आपल्या वृथा अभिमानाची आणि अज्ञानाची द्योतक आहेत हे शहाण्यासुरत्या …

देवाची भीती काढून घेतली तर काय होईल?

मी नास्तिक आहे. सध्याचे प्रचलित धर्म जे शिकवतात तसा कुठलाही ईश्वर/अल्ला/प्रभू अस्तित्वात नाही, तसेच स्वर्ग-नरक अस्तित्वात नाही असंच माझं मत आहे. स्वर्ग-नरकाच्या कल्पनेतून मांडलेल्या पाप-पुण्याच्या थोतांडावर माझ्यासह हजारो नास्तिकांचा विश्वास नाही. पण प्रश्न इथेच संपत नाही.  माझ्या सभोवती कित्येक श्रद्धावान लोक आहेत ज्यांच्याकडे तर्कावर जगण्याइतकी विचारक्षमता आणि त्याद्वारे तयार होणारी सारासार विवेकबुद्धी नाही. जीवन व्यतीत …